Advertisement

जम्मू-काश्मीर,पंजाब, दिल्ली हादरले

प्रजापत्र | Saturday, 05/02/2022
बातमी शेअर करा

नवी दिल्ली-जम्मू-काश्मीर पंजाब आणि दिल्लीमध्ये शनिवारी सकाळी भूकंपाचे झटके जाणवले. जम्मू-काश्मीर पाठोपाठ दिल्ली (नोएडा) आणि चंडीगढ या शहरात देखील भूकंपाचे झटके जाणवल्याने लोकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशात अनेक भागात भूकंपाचे झटके जाणवत असून, सध्या कोणत्याही प्रकारे जीवीतहानी झालेले नाही. भूकंपाची तिव्रता ५.७ रिश्टर स्केल इतकी होती.
      जम्मू काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के मोठे असून पंजाब आणि दिल्लीमध्ये मात्र भूकंपाची तीव्रता कमी होती.दिल्लीमध्ये १ मिनिट जमीन हादरली. दरम्यान यात जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे.

Advertisement

Advertisement