Advertisement

भारत इंग्लंडमध्ये आज रंगणार महाअंतिम सामना

प्रजापत्र | Saturday, 05/02/2022
बातमी शेअर करा

मुंबई-सलग चौथ्यांदा युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा भारतीय संघ पाचव्या जगज्जेतेपदापासून अवघा एक पाऊल दूर आहे. वेस्ट इंडिजमधील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर शनिवारी सायंकाळी ६.३० वाजता होणाऱ्या महाअंतिम लढतीत हेच लक्ष्य साध्य करण्याच्या निर्धाराने भारतीय खेळाडू मैदानात उतरतील. परंतु यासाठी त्यांना इतिहास रचण्याच्या उंबरठय़ावर असलेल्या इंग्लंडचा अडथळा ओलांडावा लागेल.

यश धूलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आतापर्यंत एकही लढत गमावलेली नाही. करोनाने शिरकाव केल्यानंतरही भारताची कामगिरी ढासळली नाही. साखळीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजयी सलामी दिल्यानंतर सहा प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीतही भारताने आर्यलड, युगांडाचा सहज धुव्वा उडवला. मग उपांत्य लढतीत बलाढय़ ऑस्ट्रेलियाला धूळ चारल्यामुळे भारताचेच पारडे अंतिम सामन्यासाठी जड मानले जात आहे.

Advertisement

Advertisement