Advertisement

पोस्टाने कुपन पाठवून ९२ हजार लुबाडले

प्रजापत्र | Friday, 04/02/2022
बातमी शेअर करा

बीड : काही भामटे सामान्य माणसाला गंडा घालण्यासाठी टपून बसलेले आहेत. ते यासाठी विविध युक्त्या वापरून समोरच्या व्यक्तीला फसवून स्वतःचे उखळ पांढरे करून घेत आहेत. फसवणूकीचे दररोज नवनवीन किस्से आपण ऐकतो आजही एक नवीन फसवणूकीचा प्रकार समोर आला आहे. एका महिलेला पोस्टाने एक लिफाफा आला, त्यास उघडले असता तुम्ही साडेसहा लाख रुपये जिंकलेत असं मजकूर असलेले त्यात कुपन निघालं. हे सहा लाख रुपयांचे आमिष दाखवून महिलेकडून तब्बल ९२ हजार रु. लुबाडून फसवणूक केली.

 

 

आपण सध्या मोबाइलवर फोन करून, लिंक पाठवून, अथवा बॅंकेतूनयेताना अंगावर घान अथवा पावडर टाकून, सोनं उजळून देतो असे एक ना अनेक युक्त्या वापरून भामटे सामान्य लोकांना लुबाडत आहेत. अनेक वेळा ऐकून, वाचून ही लोक यांना बळी पडतात. यात आणखी एक वेगळाच फसवणूकीचा प्रकार समोर आला आहे. एका महिलेला बुधवारी ( दि. २ ) फेब्रुवारी पोस्टाने एक लिफाफा आला. त्यांनी तो खोलला असता त्यात एक कुपन निघालं. त्यावर आपण ६ लाख ५० हजार रु. जिंकलात असे मजकूर होते. तसेच ही रक्कम मिळविण्यासाठी कुपन स्क्रॅच करुन त्यात असलेलं काड मोबाईलवर टाईप करा असे सांगितले होते. सदरील महिलेने तो कोड टाकलं परंतु जिंकलेली रक्कम काही आली नाही. मग त्यांनी त्यावर असलेल्या मोबाईल क्रमांकावर फोन केला. समोरील व्यक्तीने त्यांना साडेसहा लाख रु. जिंकल्याचे सांगितले परंतु त्यासाठी काही नियम सांगून बँक खात्याचे सर्व डिटेल्स व्हाट्सअप वर पाठविण्याचे सांगितले सर्व बॅंक डिटेल्स घेतले. यानंतर सदरील महिलेस फोन करून वेगवेगळे टॅक्स सांगून पैसे पाठविण्यास सांगितले. साडेसहा लाख येणार म्हणून त्या महिलेने कसलाही विचार न करता दोन दिवसात टप्याटप्याने गुगल पे वरुन तब्बल ९२ हजार रुपये पाठवले. यानंतर ही पैसे आले नाहीत. समोरील व्यक्तीचा फोनवर प्रतिसाद मिळत नाही. हे पाहून फसवणूक झालेल्या शीतल राजेश काबरा रा. भगीरथ कॉलनी, जळगाव यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी सरळ पोलीस ठाणे गाठून जिल्हा पेठ पोलीसात फिर्याद दिली. त्यावरून पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस घटनेचा तपास करीत आहेत.

Advertisement

Advertisement