कणकवली : शिवसैनिक संतोष परब यांच्यावर गेल्या १८ डिसेंबरला झालेल्या हल्ल्याप्रकरणी प्रमुख संशयित असलेले नितेश राणे सुमारे तीन आठवडे अज्ञातवासात राहून अटक टाळण्यासाठी न्यायालयीन लढाई लढत होते. देशातील सर्वोत्तम वकिलांची फौजही त्यासाठी झटत होती. अखेर न्यायालयाच्या आदेशाने ते पोलिसांना शरण गेल्याने त्यांना न्यायालयीन कोठडी मिळेल असा अंदाज वर्तविला जात असतानाच न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली . कारण पोलिसांनी नितेश राणे आणि त्यांचा स्वीय सहाय्यक राकेश परब यांना समोरासमोर बसवून चौकशी करण्यासाठी दहा दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, अशी त्यांची मागणी होती़ , त्यामुळे न्यायालयाने नितेश राणेंना २ दिवसांची पोलीस कोठडी दिली. आता कोठडीत नितेश राणे आणि त्यांचा स्वीय सहायक राकेश परब यांची समोरासमोर चौकशी होणार आहे.
शिवसैनिक संतोष परब यांच्यावर गेल्या १८ डिसेंबरला झालेल्या हल्ल्याप्रकरणी प्रमुख संशयित असलेले नितेश राणे सुमारे तीन आठवडे अज्ञातवासात राहून अटक टाळण्यासाठी न्यायालयीन लढाई लढत होते.या प्रकरणात नितेश यांनी अटक टाळण्याचा पूर्ण प्रयत्न केला़ स्थानिक न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली़ तिथेही यश न मिळाल्याने राणे सर्वोच्च न्यायालयात गेले़ सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सक्षम न्यायालयात शरण जाण्याची सूचना केली. तसे न करता दोन दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयामध्ये नियमित जामीन मिळावा, यासाठी राणे यांनी अर्ज दाखल केला. जिल्हा न्यायालयाने तोही फेटाळला. त्यावर त्यांनी पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ती मागे घेऊन नितेश हे बुधवारी कणकवली न्यायालयामध्ये शरण आले. त्यावेळी त्यांना न्यायालयीन कोठडीत मिळेल असा अंदाज व्यक्त होत होता. त्यांच्या वकिलांनी तसा युक्तिवाद देखील केला. तेश यांनी कणकवली पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस तपासात सहकार्य केले असल्याने पोलीस कोठडीची गरज नाही, असा युक्तिवाद राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी केला. मात्र पोलिसांनी आपल्याला या प्रकरणातील गुन्हेगारी कट उघड करायचा असल्याने नितेश राणे आणि त्यांचा स्वीय सहायक राकेश परब याला समोरासमोर बसवून चौकशी करायची असल्याचा केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालायने नितेश राणेंना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आता ती मुदत उद्या (दि. ४ ) संपत असून त्यानंतरच नितेश राणेंच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.
बातमी शेअर करा