Advertisement

पवनदीप राजनचे मराठी चित्रपटात पदार्पण

प्रजापत्र | Wednesday, 02/02/2022
बातमी शेअर करा

मुंबई- गायक पवनदीप राजन त्याच्या सुमधुर आवाजामुळे ओळखला जातो. इंडियन आयडॉलची ट्रॉफी जिंकल्यावर त्याला अनेक ऑफर्स येत आहेत. तो सतत त्याच्या कामात व्यग्र असून त्याने आता मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. पवनदीपचा आवाज आता तुम्ही मराठीतही ऐकू शकता. महेश मांजरेकर यांचा आगामी 'पांघरुण' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील सर्व गाण्यांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. परंतु यातील 'सतरंगी रे' या गाण्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
'सतरंगी रे' हे गाणं पवनदिप राजन याने संगीतबद्ध केलं असून त्याने आणि आनंदी जोशीने हे गाणं गायलं आहे. हे गाणं प्रेक्षकांना प्रचंड आवडलं आहे. पवनदीप मराठी नसूनही त्याचे उच्चार आणि शब्द स्पष्ट असल्याने त्याचं कौतूक होतं आहे.महेश मांजरेकर दिग्दर्शित 'पांघरूण' ४ फेब्रुवारी रोजी जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. गेल्या दोन वर्षांपासून हा चित्रपटाची वाट प्रेक्षक बघत आहेत त्यामुळे या चित्रपटाची वाट प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

 

Advertisement

Advertisement