मुंबई-दिवंगत अभिनेता ओम पुरी यांच्यासोबत 'कागर: लाइफ ऑन द एज' चित्रपटात काम केलेले अमिताभ दयाल यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या १३ दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान २ फेब्रुवारी २०२२ रोजी पहाटे ४ वाजून ३० मिनिटांनी त्यांचं निधन झालं. याशिवाय अमिताभ यांनी रंगदारी (२०१२) आणि धूम (२०१३) या चित्रपटांमध्येही काम केले होते.
अमिताभ दयाल यांनी 'विरुद्ध' आणि 'कागर' सारख्या चित्रपटांमध्ये काम करण्यासोबतच पत्नी मृणालिनी पाटील दिग्दर्शित धूम (२००१३), रंगदारी (२०१२), ये दिल्लगी (२०१३) यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले होते. अमिताभ दयाल यांचा जन्म बिलासपूर, छत्तीसगड येथे झाला. मृणालिनी पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, अमिताभ दयाल यांचे काही नातेवाईक छत्तीसगडहून येणार आहेत. त्यानंतर आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.