PM Modi's Mann Ki Baat Live: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'मन की बात' मधून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन केलं. 2022 मधील पहिल्या मन की बात कार्यक्रमात त्यांनी विविध विषयांवर संवाद साधला. भ्रष्टाचार ही देशाला लागलेली कीड आहे असं म्हणत आपण सगळे मिळून प्रयत्न केल्यास ही कीड नष्ट होऊ शकतं, असं ते म्हणाले.
बापूंच्या विचारांची शिकवण - पीएम मोदी
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज आपले पूज्यनीय महात्मा गांधी म्हणजे बापूंची पुण्यतिथी आहे. 30 जानेवारीचा हा दिवस आपल्याला बापूंच्या विचारांची शिकवण देतो. काही दिवसांपूर्वी आपण 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला. त्यात वेगवेगळ्या संस्कृतीचं दर्शन घडवणारे चित्ररथ होता. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत. राजपथावर झालेल्या चित्ररथाच्या रॅलीत आपल्या देशाचं शौर्य आणि सामर्थ्य दिसून आलं. देशातील राष्ट्रीय प्रतिकांना पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देण्याचे प्रयत्न या माध्यमातून सुरु केला आहे. आपण इंडिया गेटजवळ ‘अमर जवान ज्योति’ आणि जवळच असलेल्या ‘National War Memorial’मधील प्रज्ज्वलित ज्योतीचं विलनीकरण केलं आहे, असं ते म्हणाले.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित केलं. मन की बातच्या माध्यमातून त्यांनी संवाद साधला. आज मन की बात कार्यक्रमाच्या वेळेत बदल करण्यात आला होता. दरवेळी सकाळी 11 वाजता होणारा मन की बात कार्यक्रम आज 11.30 वाजता पार पडला.
एक कोटींहून अधिक मुलांनी पोस्टकार्ड लिहिली - मोदी
पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं की, अमृत महोत्सवाच्या निमित्तानं आपण मला कित्येक जणांनी पत्र आणि मेसेज पाठवले आहेत. यात काही सूचना देखील आल्या आहेत. काही गोष्टी यावेळी अविस्मरणीय घडल्या आहेत. मला एक कोटींहून अधिक मुलांनी पोस्टकार्ड लिहून पाठवली आहे.
दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी आकाशवाणी आणि डीडी चॅनलवर प्रसारित केल्या जाणाऱ्या 'मन की बात' या कार्यक्रमाचा आजचा 85वा भाग प्रसारित झाला आहे. प्रसार भारती आपल्या आकाशवाणी नेटवर्कवर हा कार्यक्रम 23 भाषांमध्ये प्रसारित करते. याव्यतिरिक्त प्रसार भारती आपल्या विविध डीडी चॅनल्सवर या कार्यक्रमाच्या व्हिज्युअल आवृत्त्या हिंदी आणि इतर भाषांमध्येही प्रसारित केल्या जातात.
मागील डिसेंबर 2021 च्या मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींनी 'स्क्रिन टाइम' जास्तच वाढत चालल्याचं सांगत पुस्तक वाचन वाढणं गरजेचं असल्याचा सल्ला दिला होता. पुस्तकं -ग्रंथ काही फक्त ज्ञान देतात असं नाही तर व्यक्तिमत्व घडवण्याचं, आयुष्य घडवण्याचंही काम करतात, पुस्तक वाचण्याच्या छंदामुळं एका अवर्णनीय आनंदाची अनुभूती मिळते, असं त्यांनी म्हटलं होतं. पुण्याच्या भांडारकर इन्स्टिट्यूटचं मोदींनी कौतुक केलं होतं.
2014 पासून सतत करत आहेत 'मन की बात'
पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी रेडिओवर ‘मन की बात’ कार्यक्रमाची सुरुवात केली होती. ऑक्टोबर 2014 मध्ये मोदींनी मन की बातची सुरुवात केली होती. पंतप्रधान मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवार मन की बातद्वारे संवाद साधत असतात. आज 84 वी मन की बात आहे. या कार्यक्रमाचं पहिलं प्रसारण 3 ऑक्टोबर 2014 साली झालं होतं. त्यानंतर प्रत्येक महिन्याला पंतप्रधान या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांसोबत अनेक मुद्द्यावर चर्चा करतात.