Advertisement

माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीची आत्महत्या

प्रजापत्र | Friday, 28/01/2022
बातमी शेअर करा

बंगळुरू: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बीएस येडियुरप्पा  यांची नात सौंदर्या  हिने गळफास लावून आत्महत्या केली आहे. बंगळुरूत ही घटना घडली. 30 वर्षीय सौंदर्या ही बंगळुरूच्या एमसएस रमैया रुग्णालयात डॉक्टर होती. येथील माऊंट कार्मेल कॉलेजजवळील एका अपार्टमेंटमध्ये सौंदर्या ही तिचा पती आणि सहा महिन्याच्या बाळासोबत राहत होती. येडियुरप्पा यांच्या कार्यालयाने सौंदर्याने आत्महत्या केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसेच तिचे पार्थिव बॉरिंग अँड लेडी कर्जन रुग्णालयात  पोस्टमार्टेमसाठी नेण्यात आलं आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा केला आहे. सौंदर्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलं नाही. या संदर्भात पोलीस तपास करत आहेत. मात्र, सौंदर्याने आत्महत्या केली असावी, असं पोलीस सूत्रांनी सांगितलं आहे.

सौंदर्याने आत्महत्या केल्याचं कळता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तिचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी रुग्णालयात नेण्यात आला. बंगळुरूच्या हायग्राऊंड पोलीस स्टेशनने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. येडियुरप्पा यांची मोठी मुलगी पद्मा यांची सौंदर्या मुलगी आहे. सौंदर्याचा दोन वर्षापूर्वीच विवाह झाला होता. तिला सहा महिन्याचं बाळही आहे. शिवाय ती डॉक्टरही आहे. सर्व काही सुरळीत सुरू असताना सौंदर्याने आत्महत्या केल्याने येडियुरप्पा यांच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आपल्या कॅबिनेट मंत्र्यांसह रुग्णालयात धाव घेतली. मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांशी चर्चा केली. तर येडियुरप्पा यांचं सांत्वन केलं.

 

 

2018 झाला होता विवाह
डॉ. सौंदर्या व्ही वाय यांनी आज सकाळी वसंत नगर येथील फ्लॅटमध्ये पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. त्यांनी कोणत्या कारणाने आत्महत्या केली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही, असं पोलिसांनी सांगितलं. सौंदर्या यांनी डॉ. नीरज एस यांच्यासोबत 2018मध्ये विवाह केला होता. दोघेही एकाच रुग्णालयात काम करत होते. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, नीरज आज सकाळी 8 वाजता रुग्णालयात जाण्यासाठी निघून गेले होते. नीरज हे रुग्णालयात गेल्यावर दोन तासाने सौंदर्या यांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

फोनवरही रिप्लाय नाही
सौंदर्या यांच्या घरातील मोलकरणीने घराचा दरवाजा वारंवार वाजवला. मात्र कोणीच आवाज दिला नाही. त्यामुळे मोलकरणीने नीरज यांना फोन करून याबाबतची माहिती दिली. त्यानंतर नीरज यांनी सौंदर्या यांना फोन केला. मात्र, काहीच रिप्लाय आला नाही. त्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आलं. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता सौंदर्याचा मृतदेह पंख्याला लटकलेला आढळला.

 

Advertisement

Advertisement