बीड : बीड जिल्हा परिषदेने जलजीवन मिशन राबविण्यासाठी केलेल्या 'कंत्राटी ' अभियंत्यांच्या निवडी आता पुन्हा वादात सापडल्या आहेत. या निवडीला काही दिवसांपूर्वी स्थगिती देण्यात आली होती, आता पुन्हा अभियान संचालकांनीं जिल्हाधिकाऱ्यांकडून याचा चौकशी अहवाल मागविला असून औरंगाबाद विभागासाठी यंत्रणा असताना बीड जिल्हा परिषदेमार्फत स्वतंत्र निवडी का करण्यात आल्या असा सवाल विचारला आहे .
बीड जिल्हा परिषदेत जलजीवन मिशनचे काम कंत्राटी अभियंत्यांच्या निवडीवरून चांगलेच वादात अडकले आहे. कंत्राटी अभियंत्यांच्या निवडीत अनियमितता आल्याची तक्रार इंजिनियर्स असोसिएशन या संघटनेने केल्यानंतर राज्य पाणी व स्वच्छता मिशनच्या प्रकल्प संचालकांनी या निवडुईला स्थगिती देऊन या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश जिल्हाधिकत्र्यांना दिले होते. मात्र बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अद्यापही याचा चौकशी अहवाल पाठविलेला नाही. यावरून अभियान संचालक डॉ. ह्रिषीकेश यशोद यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन तातडीने चौकशी अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत.
तसेच औरंगाबाद विभागासाठी प्रकल्प व्यवस्थापन सहाय्य संस्थेची निवड करण्यात आलेली असताना बीड जिल्हा परिषदेने आपल्या स्तरावर स्वतंत्र अभियांत्रिकी सल्लागार नेमावेत ही बाब गंभीर असल्याचा ठपका ठेवत यवबाबत देखील तातडीने अहवाल मागितला आहे.