अंबाजोगाई - येथील बोधीघाट परिसरात राहणारे ज्येष्ठ नागरिक प्रभाकर सुदाम बडे (वय ८०) यांनी आज मंगळवारी (दि.२५) पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली. घरासमोरील पटांगणातील आंब्याच्या झाडास दोरीच्या साह्याने त्यांनी गळफास घेतला. अंबाजोगाई शहर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी स्वाराती रुग्णालयात पाठवून दिला आहे. दरम्यान, प्रभाकर बडे यांनी आत्महत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
बातमी शेअर करा