बीड :- सेवानिवृत्त मुख्याध्यापकाच्या बनाबट मतदान कार्डाच्या झेरॉक्स आधारा पोस्ट ऑफीसमध्ये सेव्हिंग खाते तयार करून त्यातील ७७ हजार रूपयांची रक्कम परस्पर विड्रॉल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सेवानिवृत्त मुख्याध्यापकासह महिलेविरूद्ध पेठ बीड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बीड येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक मोहन बेगवाडे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मंदाकिनी मल्हारराव मिरगे व इतरांनी दि. २ फेब्रुवारी २०१६ रोजी संगनमत करून माझ्या नावे खडकपुरा पोस्ट ऑफीसमध्ये बनावट मतदान कार्ड। |झेरॉक्सचा वापर करून सेव्हिंग खाते तयार केले. त्यामध्ये ७७हजार १०० रूपये आयकर परतावा भरून त्याच दिवशी परस्पर ७७ हजार रुपये विड्रॉल करून फसवणुक केली. याप्रकरणी मंदाकिनी मल्हारराव मिरगे व इतरांविरुद्ध पेठ बीड पोलिस ठाण्यात दि. २३ जानेवारी २०२२ रोजी कलम ४६५, ४६८, ४७१. ४०९, ३४ भा.द.वि.प्रमाणे गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास पो.उप.नि. बनकर करीत आहेत.