बीड दि.२४ (प्रतिनिधी)-मागच्या काही दिवसांपासून जिल्ह्यात बस फेऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे चित्र असताना मागच्या तीन दिवसांत तब्ब्ल साडेतीनशे कर्मचारी पुन्हा कामावर परतल्याची माहिती विभाग नियंत्रक अजय मोरे यांनी दिली आहे.जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांचे कामावर रुजू होण्याचे प्रमाण वाढल्याने सोमवारी (दि.२४) जिल्ह्यातून २३६ फेऱ्या झाल्या.यामधून ९२४० प्रवाशांनी बस सेवेचा लाभ घेतला असल्याची माहिती विभाग नियंत्रक अजय मोरे यांनी दिली.
सोमवारी बीड आगारातून ३६,परळी आगारातून २०,धारूर आगारातून ८०,गेवराई आगारातून १८,पाटोदा १६,आष्टी ४२,माजलगाव २ आणि अंबाजोगाई आगारातून २२ फेऱ्यांची नोंद झाली आहे.सोमवारी तब्ब्ल ९ हजार २४० प्रवाशांनी सेवेचा लाभ घेतला असून सध्या केवळ साध्या बस सुरु आहेत. शिवशाही आणि हिरकणी बसमधून प्रवासासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार असल्याची शक्यता आहे.
२१-२४ जानेवारीमध्ये रुजू झालेले कर्मचारी
चालक- १०८
वाहक - १५५
चालक तथा वाहक -
यांत्रिक - ५२
प्रशासकिय - २८
एकूण -३४३