Advertisement

शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत बॅग हाऊस जळून खाक

प्रजापत्र | Monday, 24/01/2022
बातमी शेअर करा

बीड-शहरातील भाजी मंडई कॉर्नर,सुभाष रोडच्या मागील गल्लीतील 'सारंग' इमारतीत तळमजल्यात गोविंद जनार्धन आगे यांचे ईश्वरी होलसेल बॅग हाऊस असून रविवारी (दि.२३) या दुकानाला शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत १५ ते १६ लाखोंचे नुकसान झाल्याची घटना समोर आली आहे.दुकानाला आग लागली त्यावेळी दुकान बंद असल्याने सर्व सामान जळून खाक झाले. 

              रविवारी (दि.२३) सायंकाळी ९.४५ दरम्यान दुकानातील लाईटच्या बोर्डात शॉर्टसर्किट होऊन आग लागली.यावेळी दुकान बंद होते. या 3 मजली इमारतीत तिसऱ्या मजल्यावर राहणारे श्री. महेश सारंग चौरे यांच्या  राहत्या घरात धूर घुसल्याने आगीची घटना उजेडात आली.तब्बल दोन तासाच्या अथक प्रयत्नाने अग्निशामक दल,पोलीस कर्मचारी व गल्लीतील इतर रहिवाशांच्या मदतीने ही आग विझवण्यात आली.या आगीत कॉलेज बॅग,ट्रॉली बॅग, ट्रॅव्हल बॅग, लेडीज पर्स,डफल बॅग,टिफिन बॉक्स, वॉटर बॉटल व इतर मालाचे संपूर्ण साहित्य जळून खाक झाले.यात १५ ते १६ लाखांचे नुकसान झाले असल्याची माहिती ईश्वरी बॅग हाऊसचे मालक गोविंद जनार्धन आगे यांनी दिली.दरम्यान बीड शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणाची नोंद करण्यात आली असून याचा तपास पोलीस मनोज परजने हे करीत आहेत.
 

Advertisement

Advertisement