बीड -मागील १५ दिवसांपासून एसटी फेऱ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली असून रविवारी (दि.२३) जिल्ह्यातून २१६ बस धावल्या.यावेळी ९ हजार ४४५ प्रवाशांनी सेवेचा लाभ घेतला असल्याची माहिती विभाग नियंत्रक अजय मोरे यांनी दिली.दरम्यान बस फेऱ्यांची संख्या वाढत असली तरी आजघडीला शिवशाही आणि हिरकणी बस स्थानकातच उभी असल्याचे चित्र आहे.
रविवारी (दि.२३) बीड आगारातून २२,परळी आगारातून २२,धारूर आगारातून ८८,गेवराईतुन १८,पाटोदा १६,आष्टी ३६ तर अंबाजोगाई आगारातून १२ फेऱ्या धावल्याने ९ हजार ४४५ प्रवाशांनी सेवेचा लाभ घेतला.दरम्यान जिल्ह्यात बस फेऱ्यांची संख्या अलीकडच्या काळात झपाट्याने वाढली असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर होण्यास मदत होत आहे.मात्र आजघडीला केवळ साध्या बसेस सुरु असून शिवशाही,हिरकणी मात्र बसस्थानकातच उभा आहेत.
बातमी शेअर करा