लातूर दि. 23 जानेवारी- लातूर (Latur) शहरातील विशाल नगर परिसरात एका महाविद्यालयीन तरुणावर कोयत्याने सपासप वार (Attack) केल्याची धक्कादायक घटना आज रविवार (दि.23) रोजी दुपारी घडली आहे.
(College youth stabbed; The tremor occurred at noon.)
विशाल नगर या लातूर शहरातील अत्यंत गजबजलेल्या आणि रहदारीचा भाग असलेल्या परिसरात आज अनेकांनी थरार अनुभवला. काही अज्ञात मारेकऱ्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर (College youth) कोयत्याने सपासप वार करत त्याला रक्ताच्या थारोळ्यात पाडलं. राहुल सुरेश उजळंबे असं हल्ला झालेल्या तरुणाचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे.
आज रविवारी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा माहिती मिळताच अवघ्या काही मिनिटातच पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली. यावेळी परिसरातील अनेक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. भरदिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.
गंभीर जखमी झालेल्या तरुणाला पोलिसांनी स्थानिक रुग्णालयात दाखल केलं आहे. याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
संबंधित तरुणावर हल्ला करणारे हल्लेखोर कोण आणि कोणत्या कारणातून हा हल्ला झाला आहे याची माहिती अद्याप मिळाली नाही. पोलिसांनी घटनेची दखल घेतली असून मारेकऱ्यांचा शोध घेतला जात आहे. हा हल्ला झाल्यानंतर घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल नगर परिसरातील साई मंदिरा शेजारील चौकात हा हल्ला झाला आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. परिसरात मात्र तणावपूर्ण वातावरण आहे. लातूर सारख्या शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेल्या शहरात सदर घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.