लातूर दि.22 जानेवारी – लातूर (Latur) जिल्ह्यात माय लेकीने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना आज शनिवारी (दि.22) समोर आली. उदगीर (Udgir) तालुक्यातील नागलगाव नजीक असलेल्या काशिराम तांडा येथे घडली.(Mother and daughter strangled; The cause of the suicide, however, is unclear.)
माय-लेकीने एका लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या (Suicide) केली आहे. याबाबत उदगीर ग्रामीण पाेलीस ठाण्यात (Police station) आकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली असून, घटनेचे कारण समाेर आले नाही.
पाेलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनूसार, उदगीर तालुक्यातील नागलगाव नजीक काशिराम तांडा आहे. या तांड्यावर वास्तव्याला असलेल्या संगिता गंगाराम चव्हाण (35) आणि अंजली गंगाराम चव्हाण (13) या माय-लेकीचा मृतदेह नागलगाव शिवारात लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत शनिवारी सकाळी आढळून आला.
याबाबत वैजनाथ तुकाराम राठोड यांनी दिलेल्या माहितीवरुन उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी (Sub-Divisional Police Officer) डॅनियल बेन यांनी भेट देत घटनेची पाहणी केली.
या घटनेचे नेमके कारण मात्र अद्याप समाेर आले नाही. पाेलीस त्या दिशेने तपास करत आहे, असे सूत्रांनी सांगितले. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) राहुलकुमार भोळ करीत आहेत.