मुंबई :भारतात दर महिन्यात दररोज सरासरी 64 हजार कोरोनाग्रस्त आढळत आहेत. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांच्या तुलनेत ही संख्या कमी आहे. गेल्या महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यात सरासरी 86 हजार कोरोनाग्रस्त आढळले होते.
सप्टेंबर महिन्यातच पूर्वी दररोज सरासरी 93 हजार केसेस आढळत होत्या. राज्यांमध्ये कोरोनाची लागण होऊन मृत्यू होण्याचं प्रमाणही कमी झालं आहे. यापूर्वीच्या महिन्यांच्या तुलनेत टेस्टिंगची संख्या वाढूनही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट झाल्याचं दिसतंय.
ऑगस्ट महिन्यात दररोज 70 हजार टेस्ट व्हायच्या. त्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये टेस्टिंगचं प्रमाण खूप वाढलं. या महिन्यात दररोज 11 लाखांहूनही जास्त टेस्ट होत आहेत. तर गेल्या महिन्यात जवळपास 10,50,000 हजार टेस्ट होत होत्या.
ही आकडेवारी बघता कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होत असल्याचं दिसतं. मात्र, या आकडेवारीचा अर्थ काढताना सावधगिरी बाळगली पाहिजे, असं साथरोगतज्ज्ञांचं म्हणणं आहे.
मास्क वापरा सुरक्षित राहा !