नुकताच बेंगळुरूच्या आकाशात मोठा अपघात होता होता वाचला. 9 जानेवारीला सकाळच्या सुमारास इंडिगो एअरलाइन्सच्या दोन विमानांनी बंगळुरू विमानतळावरून उड्डाण केले आणि दोन्ही विमानं हवेत एवढी जवळ आली की धोकादायक स्थिती निर्माण झाली होती. पीटीआयने बुधवारी डीजीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.कठोर कारवाई होणार - DGCA
अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, या घटनेची माहिती कोणत्याही लॉगबुकमध्ये नोंदवण्यात आलेली नाही अथवा भारतीय विमानतळ प्राधिकरणालाही (एआयआय) यासंदर्भात कळविण्यात आलेले नाही. या घटनेची चौकशी सुरू असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे डीजीसीएचे अध्यक्ष अरुण कुमार यांनी म्हटले आहे.
या विमानांची धडक होता-होता वाचली -
इंडिगो आणि एएआयने यासंदर्भात अद्याप कोणतेही वक्तव्य केलेले नाही. DGCA च्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे, की इंडिगोची दोन विमाने - 6E455 (बेंगळुरू-कोलकाता) आणि 6E246 (बेंगळुरू-भुवनेश्वर) - बेंगळुरू विमानतळावर 'सेपरेशन उल्लंघना'त सामील होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या दोन्ही विमानांनी 9 जानेवारीच्या सकाळी सुमारे पाच मिनिटांच्या अंतरानेच बेंगळुरू विमानतळावरून उड्डाण केले होते.एक अधिकाऱ्याने म्हटले आहे की, "उड्डाणानंतर दोन्ही विमाने एकमेकांच्या अगदी जवळ जात होती. 'अॅप्रोच रडार कंट्रोलर' ने डायव्हर्जिंग हेडिंगचा संकेत दिला, यामुळे दोन विमानांमधील हवेतील टक्कर टळली.