Advertisement

फ्रंट वर्कर्सला कोरोना:मुंबईत गेल्या 24 तासात 120 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

प्रजापत्र | Tuesday, 11/01/2022
बातमी शेअर करा

देशात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. रोजच कोरोनाचा नवा उच्चांक पाहायला मिळत आहे. त्यामुळे देशाची चिंता आता आणखीणच वाढण्यास सुरुवात झाली आहे. कोरोनाचा फटका आता फ्रंटलाईन वर्कर्सला देखील बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान मुंबईत गेल्या 24 तासात तब्बल 120 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर एका पोलिस कर्मचाऱ्यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत 126 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर एकुण 643 पोलिस कर्मचाऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 

Advertisement

Advertisement