बीड दि.७ - राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा विस्फोट सुरु आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात खबरदारी म्हणून टेस्ट वाढवण्यात येत आहेत. बीड जिल्ह्यात आज जाहीर करण्यात आलेल्या १७७६ अहवालात ऐकून १६ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत .
यामध्ये अंबाजोगाई (०३) आष्टी(०१), बीड(०७), गेवराई(०१), केज (०१) परळी(०३) इत्यादी रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आणि कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बातमी शेअर करा

