Advertisement

दोन टँकरचा भीषण अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू

प्रजापत्र | Thursday, 06/01/2022
बातमी शेअर करा

मुंबई अहमदाबाद महामार्गावर दोन टँकरचा भीषण अपघात, दोन जणांचा मृत्यू

मुंबई:- अहमदाबाद महामार्गावर दोन टँकरचा भीषण अपघात घडला आहे. यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. आज दुपारी 3.15 च्या सुमारास विरारच्या शिरसाट फाटा येथे मुंबईवरून गुजरातला  जाणाऱ्या लेनवर हा अपघात घडला आहे.  अपघात इतका भीषण होता की टँकर चालक व क्लीनरचा यात जागीच मृत्यू झाला आहे.   घटना स्थळी मांडवी पोलीस दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे हा अपघात हायवेला विरार च्या वाहतुक नियंत्रण कार्यालयाशेजारी झाला आहे

Advertisement

Advertisement