Mumbai Coronavirus : दुसऱ्या लाटेप्रमाणे आताही मुंबईतल्या खासगी रुग्णालयात भरती होण्यासाठी कोविड रुग्णांना मुंबई महापालिकेची परवानगी घ्यावी लागणार आहे. तशा सूचना मुंबई महापालिकेनं खासगी रुग्णालयांन दिल्यात. कोरोनाची तिसरी लाट आल्यामुळं, बेडची कमतरता भासू नये यासाठी मुंबई महापालिकेनं पावलं उचलायला सुरुवात केली आहे. खासगी रुग्णालयांना 80 टक्के कोविड बेडची उपलब्धता ठेवण्यास सांगण्यात आलंय. तसंच सरकारनं निर्देशित केलेले दर आकारणं खासगी रुग्णालयांना बंधनकारक असणार आहे.
मुंबईत कोरोनाचा धोका वाढल्यानं महापालिका प्रशासन सज्ज झालं आहे. रुग्णांना वेळेवर उपचार मिळावे यासाठी दुसऱ्या लाटेप्रमाणेच पालिकेच्या परवानगीशिवाय खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णाला दाखल करू नका, अशा सक्त सूचना प्रशासनाने रुग्णालयांना दिल्या आहेत. यासाठी पालिकेने नुकतिच खासगी रुग्णालयांसाठी नियमावलीही जाहीर केलीये.. यासोबत बेड्स वाढवण्यासोबत रुग्णांसाठी आयसीयू वॉर्ड सज्ज ठेवा, अशा सूचनाही पालिकेने खासगी रुग्णालयांना दिल्या आहेत.