Advertisement

अक्षय मुंदडा कोरोना पॉझिटिव्ह

प्रजापत्र | Monday, 03/01/2022
बातमी शेअर करा

अंबाजोगाई-भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांना दोन दिवसापूर्वी ओमायक्रोनची लागण झाल्यानंतर आता आज (दि.३) भाजपचे युवा नेते अक्षय मुंदडा यांची ही कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.सोशल मीडियावर त्यांनी स्वतः या बाबत माहिती दिली आहे. 
            राज्यातील १० मंत्री व २० आमदार कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. यानंतर माजी मंत्री पंकजा मुंडे यांनाही कोरोनाची दुसऱ्यांदा लागण झाली आहे. या पाठोपाठ भाजपाचे युवा नेते केज मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांचे पती अक्षय मुंदडा हे कोरोना बाधित असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले आहे. याची माहिती त्यांनी स्वतः फेसबुकवर माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. माझी तब्येत व्यवस्थित आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी व आपली काळजी घ्यावी असे आवाहन अक्षय मुंदडा यांनी केले आहे.

Advertisement

Advertisement