Advertisement

बँक कर्मचार्‍याच्या घरी चोरी

प्रजापत्र | Sunday, 02/01/2022
बातमी शेअर करा

बीड - जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटना वाढल्या. दररोज कोठे ना कोठे चोरीची घटना घडू लागली. शहरातील एकता नगरमध्ये रात्री अज्ञात चोरट्याने एका बँक कर्मचार्‍याच्या घरी चोरी करून घरातील नगदी १२ हजारासह १२ ग्रॅम सोन्याचे दागिणे चोरून नेले. घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी चोरीच्या तपासासाठी डॉग स्कॉडसह फिंगर पथकाला पाचारण केले होते.

 

कैलास सावंत (रा.एकता नगर) यांच्या घरामध्ये रात्रीच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने प्रवेश करून त्यांच्या घरातील नगदी १२ हजार रूपये व १२ ग्रॅम सोन्याचे दागिणे चोरून नेले. सकाळी उठल्यानंतर सावंत कुटूंबियांना आपल्या घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. चोरीच्या तपासासाठी फिंगर पथक, डॉग स्कॉड घटनास्थळी दाखल झाले होते. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

Advertisement

Advertisement