Advertisement

धक्कादायक ! तिसऱ्या लाटेचा सामना करायला 'परिपूर्ण' नाही एकही जिल्हा

प्रजापत्र | Sunday, 02/01/2022
बातमी शेअर करा

बीड : देशभरातच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने चर्चा सुरु असून सरकारी पातळीवर निर्बंध कठोर करण्यावर जोर दिला जात आहे. दुसरीकडे आरोग्य विभागाचे अधिकारी आतापर्यंत 'तिसऱ्या लाटेचा सामना करायला आम्ही सज्ज आहोत ' असे सांगत असले तरी आरोग्य विभागाच्याच पायाभूत सुविधांसाठीच्या निकषात राज्यातील एकही जिल्हा बसत नसल्याचे चित्र आहे. आरोग्य सुविधांच्या दृष्टीने 'परिपूर्ण ' म्हणजे ग्रीन झोनमध्ये राज्यातील एकही जिल्हा नसल्याचे पत्रच राज्याच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. राज्यातील १७ जिल्हे यलो झोनमध्ये तर १६ जिल्हे रेड झोनमध्ये असून पुणे जिल्ह्याच्या सज्जतेची माहितीच उपलब्ध नाही. दरम्यान बीड जिल्ह्यात खाटा पुरेशा असल्याचे आरोग्य विभाग सांगत होता, मात्र जिल्ह्याला आयसीयू बेड वाढविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 

राज्याच्या आरोग्य विभागाने तिसऱ्या लाटेसाठी पायाभूत सुविधांच्या बाबतीत आरोग्य यंत्रणा किती सज्ज आहे याचा आढावा घेऊन राज्याची विभागणी ३ झोनमध्ये केली आहे. यात सर्व व्यवस्था परिपूर्ण असणे असणे म्हणजे 'ग्रीन झोन ' करण्यात आला असून त्यात राज्यातील कोणताच जिल्हा नाही. म्हणजे राज्यातील सर्वच जिल्ह्यांना सज्जतेसाठी आणखी प्रयत्न करणे आवश्यक आहे . मराठवाड्यातील ८ पैकी ४ जिल्हे यलो झोनमध्ये असून ४ जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. विशेषम्हणजे बीड जिल्हा यलो तर औरंगाबाद रेड झोन मध्ये आहे.

 

 

बीड जिल्ह्याचे काय आहे चित्र

बीड जिल्ह्यात ऑक्सिजनची तरतूद आज घडीला चांगली दिसत असली तरी जिल्ह्यातील आयसीयू बेडची संख्या आवश्यकतेपेक्षा कमी असल्याचे अहवालात म्हटले आहे. बीड जिल्ह्यात ५ ठिकाणी डीसीएच ( डिस्ट्रिक्ट कोविड हॉस्पिटल ) तयार करण्यात आले असून त्या ठिकाणी ३९५ आयसीयू बेड असणे आवश्यक असताना आज घडीला केवळ २७२ आयसीयू बेड असल्याचे चित्र आहे. त्या तुलनेत जिल्ह्यात ऑक्सिजन बेडची संख्या जास्त आहे. त्यामुळे ऑक्सिजन बेडची संख्या कमी करून आयसीयू बेड वाढवावेत असे निर्देश देण्यात आले आहेत.

 

 

 

बीड जिल्ह्याला दिल्या या सूचना

आयसीयू बेड वाढविण्यासोबतच बीड जिल्ह्याला आणखी सूचना देण्यात आल्या आहेत. त्यात डीसीएचसी ( कोविड हेल्थ केअर सेंटर ) च्या ठिकाणी असलेले व्हेन्टिलेर डीसीएचम्डघ्ये हलवावेत , नर्सिंग स्कुल, आयटीआय बीड, स्त्री रुग्णालय लोखंडी सावरगाव , उपजिल्हा रुग्णालय गेवराई , ग्रामीण रुग्णालय नेकनूर, ट्रॉमा केअर सेंटर तेलंगाव याठिकाणी ऑक्सिजन सिलेंडर वाढवावेत, नर्सिंग स्कुल बीड आणि आयटीआय बीड येथे पीएसए प्लांट बसवावा, प्रत्येक ३० खाटांच्या डीसीएचसी साठी एक एलएमओ प्लांट बसवावा असे निर्देश देण्यात आले आहेत.

 

 

 

काय आहे जिल्ह्यांचे विभागनिहाय चित्र

 

Advertisement

Advertisement