Advertisement

सर्वसमावेशक नेतृत्व

प्रजापत्र | Friday, 31/12/2021
बातमी शेअर करा

क्षेत्रात त्यांचे ज्ञान वाखण्याजोगे आहे. आपल्या कणखर वाणीतून कार्यकर्ताच नव्हे तर सामान्यांना आपलंसं करून घेण्याची त्यांची हातोटी आहे. आज ते ७५ वर्षात जरी पर्दापण करत असले तरी त्यांच्यातील कामा प्रतीची आत्मियता, सातत्याने नाविन्याचा शोध घेण्याची तळमळ आम्हा सर्वांना ऊर्जा देऊन जाते. वयाच्या या टप्यावरही पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे त्यांचे काम अविरतपणे सुरू आहे. माझ्यासारख्या असंख्य माणसाला रोज नवनवीन धडे आत्मसात करण्याची संधी त्यांच्याकडून मिळत असते.सर्वसमावेश नेतृत्व असलेल्या दादांना आज वाढदिवसाच्या निमित्ताने दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा. 
             माणसांची पारख कशी करावी, याचे उत्तम उदाहरण म्हणजे दादा. अवघ्या काही मिनिटांच्या संवादात समोरची व्यक्ती कशी आहे, हे ओळखण्याची कला त्यांना आत्मसात आहे. कोणत्या माणसाकडून कोणत्या क्षणी काय काम करून घ्यायचे हे त्यांना अगदी लिलया जमते. त्यांच्या याच गुणांमुळे राज्यभर त्यांचे जाळे निर्माण झाले असून वंजारी ओबीसी विकास महासंघाच्या माध्यमातून समाजाच्या प्रश्नांवर ते सातत्याने आवाज उठवत असतात.खरं तर मोठ्या माणसांनी लिहिलेली आणि मोठ्या माणसांवर लिहिलेली अनेक पुस्तकं सर्वांनाच वाचायला उपलब्ध असतात, परंतु फार कमी नशीबवान माणसांना ती मोठी माणसं प्रत्यक्ष वाचायला मिळतात. मी दादांच्या बाबतीत अशा नशीबवानांपैकी एक.आज दादा ७५ व्या वर्षात पर्दापण करत असून त्यांच्याकडून आम्हाला जे शिकायला मिळाले,समाजासाठी काही करता आले याचा मनस्वी आनंद वाटतोय.पुढील काळात ही दादांकडून समाजाचे प्रश्न अधिक प्रगल्भपणे सोडवता यावे आणि त्यांचे मार्गदर्शन असेच आम्हाला लाभावे ही ईश्वर चरणी प्रार्थना.

 

दादासाहेब ढाकणे 


 

Advertisement

Advertisement