Advertisement

बाबरी मशीद पाडणं सुनियोजित कट होता,माझाग्य तपास यो होता'जस्टिस लिबरहान

प्रजापत्र | Saturday, 03/10/2020
बातमी शेअर करा

दिल्ली : बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने सर्व आरोपींना दोषमुक्त ठरवलं. मात्र, बाबरी मशीद विध्वंसाचा तपास करण्यासाठी स्थापन केलेल्या लिबरहान आयोगाने 2009 साली जो अहवाल सरकारला सादर केला होता त्यात बाबरी मशीद पाडणं हे 'विचारपूर्वक केलेलं कृत्य' होतं, असं म्हटलं आहे. 
पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायधीश जस्टिस मनमोहन सिंह लिबरहान यांच्यावर या प्रकरणात तपास करून लवकरात लवकर अहवाल सादर करण्याची जबाबदारी त्यावेळी सोपवण्यात आली होती.आपल्या अहवालात लिबरहान आयोगाने बाबरी मशीद विध्वंस 'विचारपूर्व केलेलं कृत्य' असल्याचं स्पष्ट म्हटलं आहे.न्या. लिबरहान यांनी सादर केलेल्या अहवालात राजकीय सत्ता मिळवण्यासाठी धर्माचा वापर करण्यापासून रोखण्यासाठी शिक्षेची तरतूद करावी, अशी शिफारस केली आहे. मात्र, त्यांच्या कुठल्याच शिफारशीची कधीच अंमलबजावणी झाली नाही.

Advertisement

Advertisement