Advertisement

फुल विक्रेत्याचे फोडले घर

प्रजापत्र | Sunday, 26/12/2021
बातमी शेअर करा

बीड - घरात कुणी नसल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडत कॉटमध्ये ठेवलेले नगदी रोख रकमेसह सोन्याचा तीन लाकांचा ऐवज लंपास केला. ही घटना पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व्हिआयपी लॉन्सच्या पाठीमागे शुक्रवारी रात्री साडेनऊ ते साडे दहाच्या दरम्यान घडली.

 

अब्दुल रहीम खान ऊर्फ कालू हे शहरातील तेलगाव नाका येथील व्हिआयपी हॉल्या पाठिमागे राहतात. कारंजावर त्यांचे फुलाचे दुकान आहे. शुक्रवारी त्यांची पत्नी दवाखान्यासाठी औरंगाबादला गेली होती. तर ते आपल्या दुकानात असताना रात्री साडेनऊ ते साडे दहाच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत दिवाणमध्ये ठेवलेले ऐंशी हजार रुपये आणि दोन ते अडीच लाखाचे सोने असा एकूण दोन ते तीन लाखांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. अब्दुल रहिम खान यांच्या सासर्‍याने कापूस विकून त्यांच्याकडे ८० हजार रुपये दिले होते. ते ८० हजार रुपये आणि सोने अब्दुल रहिम यांच्या पत्नीने दिवाणमध्ये ठेवले होते. अज्ञात चोरट्यांनी ते दिवाण तोडून सोने आणि रोख रक्कम लंपास केली. घटनेची माहिती मिळताच पेठ बीड पोलीस घटनास्थळी दाखल झाले मात्र अब्दुल रहिम यांची पत्नी औरंगाबाद येथील दवाखान्यात उपचार घेत असल्याने त्या परत आल्यावरच तुम्ही फिर्याद द्या, असे पोलीस म्हणाले. त्यामुळे अद्यापपर्यंत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झालेला नाही.

Advertisement

Advertisement