बीड-देशात कोरोनाची तिसरी पुन्हा सक्रिय होत असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असताना बीड जिल्ह्यात रविवारी (दि.२६) जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.तब्ब्ल २० महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर बीड जिल्ह्याची कोरोना रुग्णसंख्या शून्यावर आल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.
बीड जिल्ह्यात ८ एप्रिल २०२० ला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता.त्यानंतर १५ एप्रिलपासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळून येत होते.मात्र २० महिन्याच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर बीड जिल्ह्याची कोरोना रुग्ण संख्या शून्यावर आली आहे.दरम्यान देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याचे संकेत असताना आणि बीड जिल्ह्याच्या आजूबाजूला ओमिक्रोनचे रुग्ण सापडले असताना जिल्ह्यात रविवारी कोरोनाचा एकही रुग्ण न आढळून आल्यामुळे हा मोठा दिलासा मानला जात आहे. १०४९ नमुने तपासण्यात आले असून सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
बातमी शेअर करा