Advertisement

ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकार सतर्क

प्रजापत्र | Saturday, 25/12/2021
बातमी शेअर करा

मुंबई : देशभरात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा (omicron) वेगानं प्रसार होतोय आणि त्यापार्श्वभूमीवर आता केंद्र सरकार सतर्क झालंय. महाराष्ट्रासह 10 राज्यात केंद्र सरकारनं मल्टिडिसिप्लिनरी टीम्स पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या घडीला देशात 415 ओमायक्रॉनग्रस्तांची नोंद झालेली आहे. त्यामुळे ज्या राज्यात वेगानं संसर्ग पसरतोय अथवा जिथे लसीकरण कमी आहे अशा राज्यात ही पथकं तैनात होणार आहेत.

 

यामध्ये केरळ, महाराष्ट्र,  तामिळनाडू, पश्चिम बंगाल, मिझोरम, कर्नाटक, बिहार उत्तरप्रदेश, झारखंड आणि पंजाब या राज्यांचा समावेश आहे. या मल्टिडिसिप्लिनरी टीम्स प्रत्येक राज्यात  तीन ते पाच दिवस थांबणार असून त्या राज्यातील आरोग्य यंत्रणेसोबत काम करणार आहे. रोज संध्याकाळी 7 वाजता या टीम त्या राज्यातील परिस्थितीचा रिपोर्ट करणार आहे. 

 

 

देशात ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णसंख्येत वाढ होतेय. देशातील ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 360 वर गेलीय. यापैकी नऊ राज्यांमध्ये 86 टक्के म्हणजेच जवळपास 315 हून अधिक ओमायक्रॉनचे रुग्ण आहेत. महाराष्ट्रातही ओमायक्रॉननं टेन्शन वाढवलंय. राज्यातील ओमायक्रॉनबाधितांची संख्या 108 वर गेली आहे. भारतातील 17 राज्यांमध्ये 415 बाधिते आढळली आहेत. तर, 115 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत.  महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी विविध निर्बंध जाहीर केले आहेत

 

 

जगातील 108 देशांमध्ये या व्हेरियंटचे आतापर्यंत दीड लाखांपेक्षा अधिक रुग्ण आहेत. तर, 26 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात आतापर्यंत 17 राज्यांमध्ये आतापर्यंत ओमायक्रॉनचे 415 प्रकरणे समोर आले आहे. त्यापैकी 115 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 108 ओमायक्रॉन बाधितांची नोंद करण्यात आली आहे. भारतात ओमायक्रॉनमुळे आतापर्यंत एकही जणाचा मृत्यू झाला नाही. 

महाराष्ट्रात आज रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू राहणार आहे. राज्यभरात एकाच ठिकाणी 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. मुंबईतील आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी मुंबई महापालिकेने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. आता दुबईहून मुंबईत येणाऱ्यांना 7 दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार आहे.

Advertisement

Advertisement