बीड-तीन वर्षापूर्वी दाखल केलेले कर्ज प्रकरण वर्षभरापूर्वी मंजूर झाले. मात्र दररोज हेलपाटे मारूनही अजुनपर्यंत हातात पैसे न पडल्याने आक्रमक झालेल्या शेतमजुराने बँकेसमोरच अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्महत्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी (दि.२०) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास येथील राजीव गांधी चौकातील एसबीआय कृषी शाखेच्या बँकेसमोर घडली.
बीड तालुक्यातील खापरपांगरी येथील शेख रसुल खाजामियाँ (वय-४७) हे सोमवारी (दि.२०) सकाळी शहरातील राजीव गांधी चौकात असलेल्या एसबीआय कृषी शाखा बँकेत आले होते. त्यांनी कर्ज प्रकरण वाटपासंदर्भात चौकशी केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली गेली. त्यामुळे संतल शेख रसुल यांनी बँकेसमोरच अंगावर पेट्रोल ओतुन घेतले. यावेळी त्यांच्या पत्नीही सोबत होत्या. सदरील प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला. तेथील पोलिस कर्मचारी आणि काही पत्रकारांनी शेख रसुल यांना रोखल्याने पुढील अनर्थ टळला. शेख रसुल यांनी ऑक्टोबर २०१९ मध्ये प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजनेतंर्गत रुकेकडे १० लाख रु. कर्ज प्रकरण दाखल केले होते. ११ मार्च २०२० रोजी बँकेने शेख रसुल यांना ४ लाख ५० हजार रुपयांच्या लोन मंजुरीचे पत्र ही दिले होते. त्यानंतर बँकेत खाते उघडुन १० हजार रुपयांचा त्यांनी भरणा केला. चेकबुक, शिके बनवणे, बॉन्ड खरेदी करणे आणि दोन वेळा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे बँकेने सांगितले. दोन वेळा कोटेशन तयार करण्यास सांगितले. या सर्व प्रक्रियेत त्या शेतकऱ्याने आर्थिक, मानसिक नुकसान झाले. एवढे करूनही बँक मंजूर झालेले कर्ज प्रकरण बाटप करत नसल्याने शेख रसुल बांनी आज टोकाचे पाऊल उचलले. दरम्यान २०२०मध्ये कर्ज प्रकरण मंजूर होवुनही अद्यापपर्यंत बँकेने शेख रसुल यांना कर्ज वाटप का केले नाही ? असा प्रश्न उपस्थित होत असून संबंधित बँक अधिकाऱ्याविरुद्ध कारवाईची मागणी होऊ लागली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना ७ दिवसांपूर्वी निवेदन देवनही दखल घेतली गेली नाहीबीड तालुक्यातील खापरपांगरी येथील शेख रसुल खाजामियां यांनी मंजुर झालेले कर्ज प्रकरण बँक बाटप करत नसल्याबाबत दि. १३ डिसेंबर २०२१ रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यामध्ये कर्ज वाटपाचे आदेशीत करावे अन्यथा २० डिसेंबर रोजी आत्मदहन करण्याचा इशारा शेखरसुल यांनी दिला होता. जिल्हाधिकाऱ्यांसह अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आणि एसबीआय कृषी शाखेच्या व्यवस्थापकांनाही निवेदन दिले होते. मात्र एवढे करूनही कोणी दखल घेतली नव्हती त्यामुळे हा प्रकार घडला.
पेट्रोल अंगावर ओतून घेताच दोन लाखाचे कर्ज केले मंजूर
शेख रसुल यांनी बँकेसमोरच अंगावर पेट्रोल ओतून घेताच बँकेचे अधिकारी टाळ्यावर आले आणि काही क्षणात शेख रसूल यांना बँक अधिकाऱ्यांनी मुद्रा योजनेतंर्गत दोन लाखाचे कर्ज मंजुर केले. एवढेच नव्हे तर आजच्या तारखेत मंजुरी पत्रही दिले. ही तत्परता त्यांनी आधी दाखवली असती तर ही वेळ आली नसती. आता संबंधित बँक अधिकाऱ्यावर कारवाई व्हायला हवी अशी मागणी होऊ लागली आहे.