बीड : येथील द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाविरुद्ध पोलीस ठाण्यात बँकेच्या पैशांच्या गैरवापराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता बँकेच्या सभासदांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले आहेत. मुळात प्रशासक मंडळ येण्यापूर्वी जी बँकच २८० कोटींची होती, त्या बँकेत २२९ कोटींचा गैरव्यवहार कसा होईल असा सवाल बँकेचे सभासद राम गायकवाड , राहुल खडके , नारायण जोगदंड आदींनी केला आहे.
द्वारकादास मंत्री बँकेच्या संचालक मंडळाविरुद्ध गुन्हे दाखल झाल्यानंतर बँकेच्या बचावासाठी सभासद पुढे आले आहेत. द्वारकादास मंत्री बँक हे ६९ वर्ष जुनी बँक असून बँकेने आतापर्यंत प्रतिवर्षी सभासदांना लाभांश वाटलं आहे, म्हणजे बँक अजूनही नफ्यात आहे. जी बँक प्रशासक मंडळ येण्यापूर्वी २८० कोटीची होती, ज्या बँकेच्या २२ % ठेवी रिझर्व्ह बँकेच्या नियमांप्रमाणे इतर बँकेत आहेत, ज्या बँकेने मोठ्याप्रमाणावर कर्ज दिलेले आहे, त्या बँकेत २२९ कोटींचा गैरव्यवहार कसा होईल ? लेखा परीक्षकांनी हा आकडा कशाच्या आधारे काढला ? बँकेत इतका मोठा गैरव्यवहार झालाअसता तर बँक सातत्याने नफ्यात कशी राहिली असती असा सवाल बँकेचे सभासद असलेल्या राम गायकवाड , राहुल खडके , नारायण जोगदंड आदींनी केला आहे. तसेच बँकेच्या ठेवी सुरक्षित असल्याचे आणि ठेवीदारांनी घाबरून जाऊ नये असे बँकेच्या प्रशासकांनी सुद्धा सांगितले आहे , याचाही पुनरुच्चार सभासदांनी केला असून बाणेकतील सामान्यांचा पैसे सुरक्षित असल्याचे म्हटले आहे.
प्रजापत्र | Monday, 20/12/2021
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा