Advertisement

पीक विमा कंपनीकडून पंचनाम्यात ढिलाई

प्रजापत्र | Friday, 02/10/2020
बातमी शेअर करा

बीड : बीड जिल्ह्यात चालु खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. यासाठी अनेकांनी पीकविमा कंपनीला माहितीही दिली आहे. मात्र या माहितीनूसार पंचनामे करण्यात पीक विमा कंपनीकडून ढिलाई होत असल्याचे चित्र आहे. तब्बल 1188 तक्रारी आल्यानंतर आजपर्यंत केवळ 27 ठिकाणीच सर्व्हे करण्यात आला आहे. 
बीड जिल्ह्यात यावर्षी 17 लाख 76 हजार 854 शेतकर्‍यांनी खरीपाचा पीकविमा उतरवला आहे. या पोटी पीकविमा कंपनीला तब्बल 797 कोटी रुपये मिळाले आहेत. मागच्या पंधरवाढ्यात बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरीपाच्या पीकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अतिवृष्टी, पुरपरिस्थिती अशा प्रकरणात पिकांचे नुकसान झाल्यास मदत देण्याची तरतूद आहे. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांनी पीकविमा कंपनीकडे नुकसानीची माहिती नोंदवली. पीकविमा कंपनीला अशा तब्बल 1188 तक्रारी देण्यात आल्या आहेत. यात बीड 326, पाटोदा 30, आष्टी 23, शिरुर 38, माजलगाव 191, गेवराई 288, धारुर 9, वडवणी 18, अंबाजोगाई 118, केज 30 तर परळीतील 117 प्रकरणांचा समावेश आहे. मात्र विमा कंपनीने आतापर्यंत केवळ 27 प्रकरणात सर्व्हेक्षण केले असून यात आष्टी 6, माजलगाव 10, गेवराई 10 आणि वडवणीच्या एका प्रकरणाचा समावेश आहे.

 

Advertisement

Advertisement