पुणे : म्हाडा पेपरफुटी प्रकरणातील आरोपींना 23 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) कडून विविध पदांच्या भरतीसाठी आयोजित करण्यात आलेली परीक्षा अचानक रद्द करण्याचा निर्णय राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घेतला होता.
आव्हाड यांनी भल्या पहाटे पेपर फुटले असल्याचे कारण देत, परीक्षा रद्द करण्यात येत असल्याची घोषणा केली होती. या प्रकरणात पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने सहा आरोपींना अटक केली होती. या आरोपींना न्यायालयामध्ये हजर केले असता या सर्व आरोपींना न्यायालयाने १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आता आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली असून सर्व आरोपींना २३ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
म्हाडा पेपरफुटी प्रकरणातील आरोपींची नावे :
डॉ. प्रीतिश देशमुख, संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ
वरील आरोपींना 23 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आरोग्य भरती पेपरफुटीतील आठ आरोपी :
उद्धव नागरगोजे, डॉक्टर संदीप जोगदंड, श्याम मस्के, राजेंद्र सानप, महेश बोटले
वरील आरोपींना 20 तारखेपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
तर, अजय चव्हाण, अंकित चनखोरे आणि कृष्णा जाधव यांना 22 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
असे एकूण 8 आरोपी आरोग्य भरती पेपर फुटी प्रकरणात सामील आहेत.
आरोग्य भरतीतील आरोपी अंकित चनखोरे, अजय चव्हाण आणि कृष्णा जाधव यांच्यावर म्हाडाच्या पेपरफुटी प्रकरणात देखील गुन्हा दाखल आहे.
                                    
                                
                                
                              
