Advertisement

बनेश्वर शिक्षण संस्थेचे सचीव तथा सामाजिक राजकीय कार्यकर्ते अंकुशराव काळदाते यांचे निधन

प्रजापत्र | Friday, 02/10/2020
बातमी शेअर करा

अंबाजोगाई :बनेश्वर शिक्षण संस्थेचे सचीव, राष्ट्रसेवादलाचे प्रमुख कार्यकर्ते अंकुश नारायणराव काळदाते यांचे काल १ आँक्टोबर रोजी रात्री वयाच्या ६९ व्या वर्षी निधन झालेबनसारोळा येथील मुळ रहिवासी असलेले अंकुशराव काळदाते यांचा जन्म ६ जानेवारी १९५२ रोजी चा असून महाविद्यालयीन शिक्षणासोबतच ते सामाजिक राजकीय कार्यात सक्रिय होते.
गेले अनेक दिवसांपासून पोटातील आतड्याच्या कँन्सरने आजारी होते. या आजारावर त्यांचेवर महाराष्ट्रातील अनेक नामांकित रुग्णालयात उपचार घेण्यात आले होते मात्र या उपचाराला त्यांच्या प्रकृतीने प्रतिसाद दिला नव्हता. गेले कांही दिवसापासून त्यांचेवर महाराष्ट्रातील अनेक नामांकित रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरु होते. मात्र या उपचाराला प्रतिसाद न देतालातुर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असतांनाच त्यांनी काल १ आँक्टोबर रोजी वयाच्या ६९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 
अंकुशराव काळदाते महाविद्यालयीन शिक्षणापासूनच सामाजिक चळवळीशी निगडीत होते. त्यांचे वडील शिक्षण महर्षी नारायणराव काळदाते,  चुलते डॉ. बापुसाहेब काळदाते हे राष्ट्रसेवादलाशी निगडीत असल्यामुळे ते सहाजिकच राष्ट्रसेवादलाचे घटक बनले. यासोबतच डाव्या विचारसरणीच्या जनतादल या पक्षासोबत आणि काही काळ अनिल गोटे व नंतर गोपिनाथराव मुंडे साहेबांचे विश्वासू सहकारी म्हणून ही ते राजकारणात ही सक्रीय होते. बनेश्वर शिक्षण संस्था, राजकारण, समाजकारण, शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयीचे आंदोलन, आंतर भारती, अक्षर मानव, किसानपुत्र आंदोलन, मसाप, आदि सामाजिक संघटनांच्या कार्यात सक्रिय सहभागी होणा-या अंकुशराव काळदाते यांचे संबंध सर्वच राजकीय आणि सामाजिक नेत्यांसोबत अगदी चांगले होते. अत्यंत मितभाषी, मृदु स्वभावाच्या अंकुशराव काळदाते यांचा अडचणीत असलेल्या सामान्य लोकांच्या मागे उभा टाकुन त्याचे काम करुन देण्यात नेहमी हातखंडा असायचा. 
शिक्षण महर्षी नारायणराव काळदाते यांच्या निधनानंतर बनेश्वर शिक्षण संस्थेचे सचीव म्हणून व मानवलोकचे सदस्य म्हणून ते काम पहात होते. एका निस्पृह आणि धडाडीच्या कार्यकर्त्याचे असे अकाली निधन होणे त्यांच्या परीवारासह  मित्र परिवाराला धक्का लावणारे ठरले आहे. अंकुशराव  काळदाते यांच्या अकाली निधनाने त्यांच्या चाहत्यांमध्ये दु:ख पसरले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, नातवंडे आदि परीवार आहे.

Advertisement

Advertisement