बीडः दोन दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील पोलीस दलात झालेल्या फेरबदलानंतर आता बीड जिल्ह्यातील महसूल विभागातही मोठे बदल झाले आहेत. विशेष म्हणजे अनेक महिन्यानंतर बीडला पुर्णवेळ निवासी उपजिल्हाधिकारी मिळाले आहेत. संतोष राऊत यांची निवासी उपजिल्हाधिकारी बीड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
शुक्रवारी महसूल विभागातील बहु प्रतिक्षित बदली आदेश अखेर निघाले. यात संतोष राऊत (औरंगाबाद) निवासी उपजिल्हाधिकारी बीड अशी नियुक्ती देण्यात आली आहे तर तलाठ्यांना पैसे खाण्याची शिकवणी दिल्याचा आरोप असलेल्या अंबाजोगाईच्या वादग्रस्त उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांची लातुर ला उप जिल्हाधिकारी पुनवर्सन या पदावर नियुक्ती झाली आहे. नम्रता चाटे(पाटोदा) उपविभागीय अधिकारी परळी, शरद झाडके (बिलोली) उप विभागीय अधिकारी अंबाजोगाई, श्रीकांत गायकवाड (रोहयो, बीड) उप विभागीय अधिकारी माजलगाव तर मंदार वैद्य यांना उप जिल्हाधिकारी रोहयो औरंगाबाद आणि प्रभोदय मुळे यांना उप विभागीय अधिकारी कंधार म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.
तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या देखील मोठया प्रमाणावर बदल्या झाल्या आहेत. यात किरण अंबेकर(बीड) नांदेड, प्रतिभा गोरे (माजलगाव) पालम, श्रीकांत निळे (महसुल बीड) पाथरी, धोंडीबा गायकवाड (गेवराई) हिमायतनगर, वैभव महिंद्रकर (आष्टी ) जालना, सचिन खाडे (सपुअ बीड) गेवराई, राजाभाऊ कदम (आयुक्तालय औरंगाबाद) आष्टी, वैशाली पाटील (नांदेड) माजलगाव, विपीन पाटील (परळी) अंबाजोगाई, एस व्ही शेजुळ (जिंतूर) परळी, रामेश्वर गोरे (सिल्लोड) उदगीर अशा बदल्या झाल्या आहेत.
प्रजापत्र | Friday, 02/10/2020
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा