Advertisement

देवस्थान जमीन ( land scam ) प्रकरणात आता देवेंद्र फडणवीसांची एन्ट्री (entry )

प्रजापत्र | Monday, 13/12/2021
बातमी शेअर करा

बीड : आष्टी तालुक्यातही देवस्थान जमीन घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आल्या नंतर आता या प्रकरणात माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील एन्ट्री केली आहे. एसआयटीकडे (SIT ) केवळ विशिष्ट प्रकरनेच न देता बीड जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी वक्फ आणि देवस्थान जमिनीचे हस्तांतरण झाले आहे, त्या सर्व प्रकरणाची चौकशी एसआयटीकडे द्यावी अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. फडणवीस यांनी तसे पत्र बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून यात तब्बल ३२ जमिनींचा (३२ Lands ) उल्लेख करण्यात आला आहे.

 

 

बीड जिल्ह्यातील देवस्थान जमीन घोटाळा सातत्याने चर्चेत आहे. यासंदर्भात आष्टी तालुक्यात दोन गुन्हे दाखल झाले असून काही अधिकाऱ्यांना देखील आरोपी करण्यात आले आहे,. तर राष्ट्रवादीचे पदाधिकारी असलेल्या राम खाडे यांनी यासंदर्भात थेट भाजपचे आ. सुरेश धस यांच्यावरच आरोप केले आहेत. यासर्व पार्श्वभूमीवर आष्टी तालुक्यात देवस्थान जमिनीसंदर्भात दाखल झालेल्या २ गुन्ह्यांचा तपास एसआयटीकडे देण्यात आला आहे.

 

आता या प्रकरणाला राजकीय रंग येणार असल्याचे संकेत मिळत असून राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (DEvendra Fadanvis ) यांनी देखील या प्रकरणात एन्ट्री घेतली आहे. फडणवीसांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र लिहिले असून त्यात बीड जिल्ह्यातील सर्वच देवस्थान वक्फ जमिनीच्या बेकायदा हस्तांतरणाची प्रकरणे एसआयटीकडे द्यावीत अशी मागणी केली आहे. त्यात बीड शहरातील ६, बीड तालुक्यातील ६ , धारूर २, गेवराई १, अंबाजोगाई ३, आष्टी १२ , माजलगाव १ , केज १ अशा सुमारे ३२ जमिनींची यादी जोडून ही सर्व प्रकरणे एसआयटीकडे द्यावीत अशी मागणी केली आहे.

त्यामुळे आता यासर्वच प्रकरणाची व्याप्ती वाढणार असल्याची चिन्हे आहेत .

 

आष्टीचे प्रकरण ईडीकडे

दरम्यान आष्टी तालुक्यात दाखल करण्यात आलेल्या २ गुन्ह्यांच्या संदर्भाने आता राम खाडे यांनी थेट ईडीकडे धाव घेतली आहे. त्यांनी त्यांचे वकील असीम सरोदे यांच्यामार्फत ईडीकडे तक्रार केली असून यात आ. सुरेश धस यांच्यावर मनीलॉन्डरिंगचे आरोप करण्यात आले आहेत. याप्रकरणात ईडीने चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement