Advertisement

बीड जिल्ह्याची हंगामी पैसेवारी घोषित62.89 पैशाची नोंद

प्रजापत्र | Thursday, 01/10/2020
बातमी शेअर करा

बीड दि.30 (प्रतिनिधी)ः महसुल विभागाने चालु खरीप हंगामाची हंगामी पैसेवारी घोषीत केली असून बीड जिल्ह्याची पैसेवारी 62.89 पैसे इतकी असल्याचे म्हटले आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक पैसेवारी धारूर तालुक्यात 72 तर सर्वात कमी पाटोदा तालुक्यात 52 पैसे इतकी नोंदविण्यात आली आहे.
दुष्काळ, पीकविमा आदीसाठी खरीपाची पैसेवारी हा महत्वाचा निकष असतो. 50 पैसेपेक्षा कमी पैसेवारी असेल तर दुष्काळाचे निकष लागु होतात. पीकांच्या परिस्थितीची पाहणी करून आणि पीक कापणी प्रयोग घेवून पैसेवारी जाहीर केली जाते. सप्टेंबरच्या अखेरीस हंगामी पैसेवारी तर ऑक्टोंबर अखेरीस अंतिम पैसेवारी जाहीर केली जाते. त्यानुसार बीड जिल्ह्याची हंगामी पैसेवारी घोषीत करण्यात आली आहे. 
जिल्ह्यात 9 लाख 27 हजार 741 हेक्टर इतके क्षेत्र लागवडी योग्य असून त्यापैकी 8 लाख 35 हजार 403 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाल्याची नोंद आहे. जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 1402 गावांमध्ये पीक परिस्थिती बरी असून जिल्ह्याची सरासरी पैसेवारी 62.89 पैसे इतकी असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी जाहीर केले आहे.

Advertisement

Advertisement