Advertisement

राज्यात वाढत्या ओमयाक्रॉनच्या रुग्णसंख्येमुळे राज्य सरकारचा मोठा निर्णय

प्रजापत्र | Saturday, 11/12/2021
बातमी शेअर करा

देशात करोना विषाणूच्या ओमायक्रॉन या व्हेरिएंटचे शुक्रवारी २५ रुग्ण आढळले असून या वाढत्या रुग्णसंख्येबाबत देशाच्या करोना कृतिदलाचे प्रमुख आणि निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी धोक्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, शुक्रवारी मुंबईत तीन आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ओमायक्रॉनच्या चार रुग्णांचे शुक्रवारी निदान झाले. त्यांत एका तीन वर्षांच्या बालिकेचा समावेश आहे. मुंबईतील एक रुग्ण धारावीतील रहिवासी आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेत मुंबईत दोन दिवसांच्या जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत.

 

 

राज्यातील ओमायक्रॉन प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर ११ आणि १२ डिसेंबर रोजी मुंबईत कलम १४४  लागू करण्यात आले. त्यामुळे व्यक्ती किंवा वाहनांच्या रॅली/मोर्चे/मिरवणुका इत्यादींना मनाई करण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण १७ ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळले आहेत.

 

 

ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटमुळे संसर्गाचा धोका वाढू नये यासाठी मुंबईत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून निर्बंध लावण्यात आले आहेत. याआधी ओमायक्रॉन या करोनाच्या नव्या विषाणूमुळे जमावबंदीसारखे निर्बंध अकोला जिल्ह्यात लावण्यात आले होते.

Advertisement

Advertisement