मुंबई : एसटी कर्मचारी संपाबाबात परिवहन मंत्री अनिल परब यांनी मोठी घोषणा केली आहे. जे कर्मचारी सोमवारपर्यंत कामावर येतील त्यांचे निलंबन मागे घेवू. अन्यथा कारवाई करण्यात येईल, असे संकेत दिले आहेत. मात्र, कर्मचाऱ्यांना कामावर यायचे आहे. परंतु काहीजण त्यांना अडवत आहेत, असा आरोप अनिल परब यांनी केला आहे.
एसटी संपाबाबत जी समिती नेमली गेली आहे. त्यानुसार पुढील निर्णय होईल. तसेच या समितीचा निर्णय होईपर्यंत कर्मचाऱ्यांना 41 टक्के पगारवाढ दिली आहे. सदाभाऊ खोत आणि भाजप आमदार गोपिचंद पडळकर हे कामगारांना समजावण्यात अपयशी ठरले आहेत, असे परब म्हणाले.
राज्यात आतापर्यंत 10 हजार कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले आहे. कर्मचाऱ्यांच्या लक्षात येवू लागले आहे की विलिनीकरणाचा मुद्दा न्यायालयात आहे. कर्मचाऱ्यांचे विविध गट भेटत आहेत. तसेच प्रत्येक आत्महत्येशी एसटी संपासोबत जोडले जात आहे, असे अनिल परब म्हणाले.
कर्मचाऱ्यांना कामावर यायचे आहे. परंतु त्यांना अडवले जात आहे. काहीजण त्यांचे मोठे नुकसान करत आहे. दरम्यान, जे कामगार सोमवारपर्यंत कामावर येतील त्यांचे निलंबन मागे घेवू, असे अनिल परब म्हणाले.
                                    
                                
                                
                              
