Advertisement

बालाघाटावर चोरट्यांचा धुमाकूळ

प्रजापत्र | Wednesday, 08/12/2021
बातमी शेअर करा

नेकनूर/चौसाळा-बालाघाटावर नेकनूर आणि चौसाळा हद्दीमध्ये दरोडेखोरांनी मंगळवारी रात्री धुमाकूळ घातला.सुलतानपुर येथे एका जणास मारहाण करून त्याच्याकडील सोन्या,चांदीचे दागिने लुटून नेले.त्याचबरोबर सफेपुर येथेही दोघांना मारहाण करून लूटमार करण्यात आली असून नेकनूरमध्ये तीन ठिकाणी चोरीचा प्रयत्न करण्यात आला,मात्र यामध्ये चोरट्यांना मोठा ऐवज लुटण्यात यश आले नाही.दरम्यान चोरीच्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  

 

 

                नेकनूरपासुन काही अंतरावर असलेल्या सुलतानपुर येथील अशोक दगडू नाईकवाडे यांच्या घरी अज्ञात दरोडेखोरांनी प्रवेश केला.त्यांना दरोडेखोराने गजाने मारहाण केली.यामध्ये त्यांच्या कानाला गंभीर दुखापत झाली.दरोडेखोराने त्यांच्या जवळील सोन्याचे दागिने लुटले.त्यानंतर दरोडेखोरांनी सफेपुर येथे धुमाकूळ घातला.येथील रामभाऊ किसन घोडके,गोरख रामभाऊ घोडके या दोघांना मारहाण करत त्यांच्या जवळील ७ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम जबरीने लुटून नेले.नेकनूर येथे ही माजी सरपंच शेख आझम पाशा यांच्या येथील कपाट फोडून सात हजार लंपास केले तर एका अन्य घरीही गेट चे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला . तर गारवा हॉटेलला ही चोरट्याने लक्ष केले तेथील कामगारांची बॅग गायब केल्याने बॅगेतील दोन तीन हजार लंपास केले. सीसीटीव्ही मध्ये चोरटे कैद झाले आहेत. या परिसरातील नागरिक सतर्क होते . त्यांना दरोडेखोर आल्याचे समजताच नेकनूर पोलीसांशी संपर्क साधला . पोलीसांनी घटनास्थळी धाव घेण्याच्या आधी दरोडेखोर पसार झाले . दरम्यान दरोडेखोरांनी या ठिकाणी दगडफेक केली असल्याचे सांगण्यात येते . एकाच रात्री एका ठिकाणी सशस्त्र दरोडा आणि तीन ठिकाणी दरोड्याचा प्रयत्न झाल्याने नेकनूर हद्दीमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले . मारहाणीमध्ये जखमी झालेल्या तिघांना बीडच्या जिल्हा रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते . या प्रकरणी अज्ञात दरोडेखोरांविरोधात नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे .

Advertisement

Advertisement