औरंगाबाद : बीड जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलेल्या हजारो एकरच्या देस्थान जमीन घोटाळ्यात आता भाजपचे आ. सुरेश धस यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. या जमीन घोटाळ्याला आ. सुरेश धस जबाबदार असल्याचा आरोप या प्रकरणातील तक्रारदार राम खाडे यांच्यासह शेख अब्दुल गाणी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. यावेळी असीम सरोदे यांचीही उपस्थिती होती 
बीड जिल्ह्यातील देवस्थान जमीन घोटाळा सध्या सर्वत्र चर्चेत आहे. याच संदर्भात आज या प्रकरणातील तक्रारदार असलेल्या राम खाडे यांनी येथे पत्रकार परिषद घेतली. यात तब्बल ४ देवस्थानच्या जमिनीत घोटाळे झाले आहेत असा दावा राम खाडे यांनी केला. आ, सुरेश धस महसूल राज्य मंत्री होते  तेव्हापासून त्यांनी भ्रष्टाचाराचा चालना दिली असा आरोप करण्यात आला असून ते राज्यमंत्री असतानाच्या शेवटच्या काळात त्यांच्या निवासस्थानावर एसीबीने जमीन प्रकरणातच छापा मारला होता असेही राम खाडे  म्हणाले. आष्टी तालुक्यातील ज्या  देवस्थान जमिनीचे गैरव्यवहार झाले आहेत, त्यात आ. सुरेश धस यांच्याशी संबंधित बँकेतून पैशांचे व्यवहार झाले असून याप्रकरणी मनी लौंड्रीन्ग कायद्याखाली गुन्हा दाखल करणे आवश्यक असल्याचे तसेच देवस्थान जमिनीसोबतच महार वतनाच्या जमिनीचे देखील बेकायदा व्यवहार झाले असून याप्रकरणी आ. धस यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करावेत अशी मागणी राम खाडे  यांनी केली. आपण यासंदर्भातील सर्व कागदपत्रे एसीबीला दिली असल्याचेही खाडे यांनी म्हटले आहे. याप्रकरणात प्रथमच थेट आ. सुरेश धस यांच्यावर आरोप झाल्याने खळबळ माजली आहे. 

	   
		  
		
		 
				
        
        
            
      
      प्रजापत्र | Wednesday, 08/12/2021
	
	
	
   बातमी शेअर करा  
    
    
   
            
		
	
		
		
	
	        
	         बातमी शेअर करा  
	      	    
	    
  
	    
  
	
      
                                    
                                
                                
                              