बीड : राज्यातील नगरपंचातींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस आहे. मूळ कार्यक्रमानुसार मंगळवारी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज भरता येणार होते. मात्र आता त्या वेळेत वाढ करण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने नगर पंचायत निवडणुकीसाठी मंगळवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज करण्यास मुभा दिली आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन असल्याने उमेदवारांना सोयीचे व्हावे म्हणून ही वेळ वाढविण्यात आली आहे. तसेच आरक्षित प्रभागातून निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तींकडे जात वैधता प्रमाणपत्र नसेल तर पडताळणी समितीकडे अर्ज केल्याचा पुरावा आणि १२ महिन्याच्या आत प्रमाणपत्र दाखल करण्याचे हमीपत्र देऊन अर्ज भरता येणार आहेत.
बातमी शेअर करा