बीड-महिनाभराच्या प्रतिक्षेनंतर रविवारी (दि.५) बीड जिल्ह्यातून २० बसेस प्रवाशांना घेऊन धावल्याचे पाहायला मिळाले.आज सकाळपासूनच काही चालक आणि वाहकांनी आंदोलनाच्या बाहेर पडत कामावर रुजू होण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेक प्रवाशांना दिलासा मिळाला.
बीड जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांनी विलनीकरणाच्या मागणीवर आक्रमक भूमिका घेतल्यामुळे महिनाभरात केवळ दोन बसेस प्रवाशांना घेऊन धावल्या होत्या. मात्र विभाग नियंत्रक अजय मोरे यांनी पुढाकार घेऊन रविवारी पाटोदा आगारातून ६,गेवराई आगारातून ६,बीड आगारातून ४ आणि धारूर आगारातून ६ बसेस सोडल्या. दरम्यान टप्प्याटप्याने का होईना जिल्ह्यातील वाहतूक सुरळीत होत असल्यामुळे प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
बातमी शेअर करा