Advertisement

करोनाची नवीन लक्षणं कोणती? काय काळजी घ्याल ?

प्रजापत्र | Wednesday, 30/09/2020
बातमी शेअर करा

लहान मुलांना उलट्या, जुलाब होत असतील, पोटात कळा येण ही कोरोनाची  लक्षणं असू शकतात असा दावा संशोधकांनी केला आहे. 
कोरोना व्हायरसची 13 विविध लक्षणं आतापर्यंत समोर आली आहे. या सगळ्या लक्षणांबद्दल WHO ने त्यांच्या वेबसाईटवर माहिती दिली आहे.

कोरोनाची लक्षणे 
ताप किंवा कोरडा खोकला. यापैकी काहीही झालं तरी श्वास घेण्यास त्रास होतो. 
मात्र हा खोकला काही थांबत नाही. असंही होऊ शकतो की तुम्ही खूप वेळ  खोकत आहात, किंवा दिवसांतून तीन-चार वेळा सातत्याने खोकला येतो आहे. 
तुमच्या नेहमीच्या खोकल्यापेक्षा हे जास्त गंभीर वाटू शकतं, त्यामुळे जरा काळजी घ्या . अशा वेळी घसा लाल होऊन दुखू लागतो.
म्हणूनच कोरोनाची टेस्ट  करताना थ्रोट स्वॅब घशातून घेतला जातो. 
शरीराचं  तापमान 37.8 सेल्सियसपेक्षा जास्त असू शकतं. यामुळे कणकण जाणवते, थंडी वाजू शकते किंवा थरथरल्यासारखंही वाटू शकतं.
ही लक्षणं दिसायला तीन ते सात दिवस लागू शकतात तर कधी त्याहून जास्त. WHOनुसार हा व्हायरस आपले परिणाम दाखवण्यास 14 दिवससुद्धा घेऊ शकतो. यालाच इनक्युबेशन पिरियड  म्हणतात. 

कोरोनाची आत्तापर्यंतची लक्षणे 

ताप किंवा थंडी वाजणे                        डोकेदुखी
खोकला किंवा घसा खवखवणे              स्नायू दुखणे
थकवा जाणवणे                                चव किंवा वास न कळणे
पूर्वी ही लक्षणे ताप, खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास, एवढीच मर्यादित होती.

कोरोनाची नवीन  लक्षणं कोणती?
अनेक रुग्णांमध्ये पुढील नवीन लक्षणं दिसून आली आहेत.

डोळे येणे                                         अंगदुखी
त्वचेवर लाल चट्टे, पुरळ उठणे             छाती दुखणे
हातापायांच्या बोटांवर,                       तळव्यांवर चट्टे
अतिसार किंवा हगवण लागणे             मळमळणे
छातीवर दबाव आल्यासारखं वाटणे      वाचा जाणे
नाक वाहणे                                     

सौम्य लक्षणं असतील तर काय कराव ?
सौम्य लक्षणं असणाऱ्यांनी  सात दिवसांसाठी आपल्या घरातच अलगीकरणात रहावं. 
हॉस्पिटलमध्ये गेले नाही तरी डॉक्टरांच्या सल्ल्याने घरीच औषधं घ्यावीत.

मास्क वापरा, सुरक्षित रहा 

 

Advertisement

Advertisement