Advertisement

आज उद्या आणि परवा, ”या” जिल्ह्यांत मेघागर्जना आणि पाऊस सुद्धा

प्रजापत्र | Tuesday, 30/11/2021
बातमी शेअर करा

मुंबई दि.30 –भारतीय हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार 30 नोव्हेंबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत 1 डिसेंबरलाला पूर्व मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे, त्याचा प्रभावी राज्यात काही ठिकाणी होण्याची शक्यता असल्यानं 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत मेघगर्जनेसह,जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. तर, काही ठिकाणी हलका पाऊस ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो.राज्यात येत्या 2 तारखेपर्यंत विविध ठिकाणी पावसाची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे.कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचा इशारा वेधशाळेनं दिला आहे.

 

 

हवामान विभागानं 30 नोव्हेंबरसाठी ठाणे, मुंबई, रायगड, पालघर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, नाशिक आणि अहमदगर, धुळे, नंदुरबार, औरंगाबाद, उस्मानाबद, लातूर जिल्ह्यांना यलो अॅलर्ट जारी केला आहे. यलो अॅलर्ट देण्यात आला नसला तरी पुणे, सोलापूर, जळगाव जिल्ह्यात देखील पाऊस होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

 

1 डिसेंबर,रत्नागिरी, सातारा, पुणे, रायगड, ठाणे, मुंबई, पालघर, अहमदनगर, नाशिक, बीड, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, जळगाव, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आला आहे. तर 2 डिसेंबर: रत्नागिरी, सातारा, पुणे, रायगड, ठाणे, पालघर, अहमदनगर, नाशिक, बीड, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, नंदुरबार, धुळे, जालना या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

 

 

Advertisement

Advertisement