Advertisement

पाच वर्षात पहिल्यांदाच सप्टेंबरमध्ये जिल्ह्यात ७५ टक्के पाणीसाठा

प्रजापत्र | Saturday, 26/09/2020
बातमी शेअर करा

बीड जिल्ह्यात या वर्षी पावसाने दमदार हजेरी लावल्याचा परिणाम जिल्ह्यातील पाणीसाठ्यावर झाला आहे. २०१५  पासून आजपर्यंतचा सप्टेंबरमधील सर्वात उचांक्की पाणीसाठा या वर्षी पाहायला मिळत असून पाच वर्षात पहिल्यांदाच सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील पाणीसाठा ७५ टक्क्यांवर गेला आहे. विशेष म्हणजे एका मोठ्या प्रकल्पा  सह दहा मध्यम प्रकल्प आणि ६४ लघु प्रकल्प असे ७५ प्रकल्प सध्या तुडुंब भरले आहेत. तर अजूनही तीन प्रकल्प कोरडे ठाक असल्याचे चित्र आहे. 
बीड जिल्ह्याला सातत्याने दुष्काळाची छाया सहन करावी लागते. तसेच जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प साधारणतः ऑक्टोबर नंतरच्या परतीच्या पावसाने भारतात♦. हे वर्ष मात्र  या साठी अपवाद ठरले आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्यातच जिल्ह्यतील  ७५  टक्के  सिंचन प्रकल्प  तुडुंब  भरले आहेत. विशेष म्हणजे मागच्या आठवडाभरात १९ प्रकल्प भरले आहेत. असे असले तरीही अजूनही पाच प्रकल्प  कोरडेठाक  असून १७ प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याच्या खाली गेला आहे. बीड जिल्ह्यात २०१४  ला बऱ्यापैकी पाऊस झाला होता त्यानंतर मात्र बीड जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात इतका पाणीसाठा कधीच झाला नाही. आजपर्यंत सप्टेंबर महिन्यातील जिल्ह्याचा पाणीसाठा ५० टक्क्यांपेक्षा अधिक नसायचा या वर्षी मात्र  तो पहिल्यांदाच ७५ टक्क्यांवर गेला आहे त्यामुळे बीड जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्यासोबतच  सिंचनाचाही पुढच्या काही वर्षाचा प्रश्न संपणार आहे

 

Advertisement

Advertisement