बीड - बीड-पिंपळनेर-नाथापूर रस्त्याच्या प्रश्नासाठी परिसरातील गावकरी चांगलेच आक्रमक झाले. गावकर्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करत प्रशासनाचा जाहीर निषेध केला. रस्त्याचे काम तात्काळ करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली.
पिंपळनेरच्या रस्त्याचा प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबीत आहे. सदरील रस्ता करण्यात यावा या मागणीसाठी काही दिवसांपुर्वी परिसरातील तरुणांनी रस्ता रोको आंदोलन केले होते. मात्र या आंदोलनामुळे प्रशासनाला कसलाही फरक पडला नसल्यामुळे आज गावकर्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करत प्रशासनाचा जाहीर निषेध केला. रस्ता खराब असल्यामुळे येणार्या-जाणार्या वाहन धारकांना याचा त्रास सहन करावा लागतो. या परिसरात अनेक गावे आहेत. या सर्व गावकर्यांची खराब रस्त्यामुळे गैरसोय होत असल्यामुळे प्रशासनाने आता तरी रस्ता दुरुस्त करण्याकडे वेळीच लक्ष घालावे, अशी मागणी करण्यात आली.