Advertisement

अयोध्येनंतर आता 'या' जन्मभूमिभोवती वादाचे सावट

प्रजापत्र | Saturday, 26/09/2020
बातमी शेअर करा

बीडः अयोध्येतील वादग्रस्त जागेचा निकाल राम मंदिराच्या बाजुने लागल्यानंतर आता मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मस्थानाच्या वादाला तोंड फुटले आहे. येथील श्रीकृष्णमंदिरालगत असलेली मस्जिद देखील   देवस्थानची असुन ती श्रीकृष्णाच्या ताब्यात द्यावी अशी याचिका न्यायालयात दाखल झाली आहे.
मथुरेत भगवान श्रीकृष्ण विराजमान यांच्या वतीने भगवान  श्रीकृष्णाचे मित्र म्हणून रंजना अग्नीहोत्री आणि इतर ६ जणांनी मथुरेच्या स्थानिक न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यात मथुरेतील श्रीकृष्ण मंदिरालगत असलेली मस्जिदीची जागा श्रीकृष्ण देवस्थानची आहे, आणि देवस्थानला दिलेली जागा कायम त्या देवस्थानचीच राहते. औरंगजेबाच्या सत्ताकाळात १६६९-७० मध्ये येथील मंदिर अर्धवट पाडण्यात आले आणि अर्ध्या जागेवर शाही ईदगाह मस्जिद उभारण्यात आली होती असा दावा करण्यात आला आहे. ही मस्जिद पाडुन ती जागा श्रीकृष्ण जन्मस्थानला परत द्यावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
१२/१०/१९६८ ला द कमिटी मँनेजमेंट आँफ मस्जिद ट्रस्ट आणि श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संघ यांच्यात झालेला जागा वाटप करार देखील श्रीकृष्णाची फसवणूक असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement