Advertisement

खांडेंना गुटखा भोवला, पक्षाने केली ही कारवाई

प्रजापत्र | Monday, 22/11/2021
बातमी शेअर करा

बीडः बेकायदा गुटखा साठवणूक प्रकरणात शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पक्षाने याची दखल घेतली आहे. त्यांच्या जिल्हा प्रमुख पदाला स्थगिती देण्यात आली असून नविन जिल्हा प्रमुखाची घोषणा लवकरच होणार आहे.

 

बेकायदा गुटखा प्रकरणात पाच दिवसापूर्वी शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. सत्ताधारी पक्षाच्या जिल्हा प्रमुखावरच गुन्हा दाखल झाल्याने जिल्ह्यात खळबळ माजली होती. तसेच पक्षाने खांडे यांच्यावर कारवाई करुन पक्षाची बदनामी थांबवावी अशी मागणी शिवसेनेतुनच होत होती. या पार्श्वभूमीवर आज कुंडलिक खांडे यांना पदावरुन काढण्यात आले आहे. कुंडलिक खांडेंसाठी हा मोठा धक्का असुन यामुळे बीड जिल्ह्यातील अनेक गणिते बिघडणार आहेत.

Advertisement

Advertisement